Classical Sanskrit play by Kālidāsa | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
लेखक | |||
वापरलेली भाषा | |||
| |||
मालविकाग्निमित्रम् हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदासाचे पहिले नाटक मानले जाते.[१]
अग्निमित्र एका दासीपुत्रीचे चित्र पाहून त्यावर मोहित होतो. आपल्या दरबारातील विदूषकाच्या साहाय्याने तो तिला आपल्या राज्यात आणवतो. मालविका नावाची ही मुलगी राणीची दासी होते. राणीला जेव्हा अग्निमित्राच्या मालविकेवरील प्रेमाचा संशय येतो तेव्हा ती अतिशय क्रोधित होऊन मालविकेस कैदेत टाकते. काही काळाने असे कळून येते की मालविका ही दासीपुत्री नसून राजकन्या आहे. यानंतर अग्निमित्र तिच्याशी लग्न करून तिला आपली राणी करतो.
मालविकाग्नमित्रम् नाटकात कालिदासाने शुंग साम्राज्यातील संगीत व अभिनय करणाऱ्या कलाकारांचे चित्रण केले आहे. याशिवाय या नाटकात सम्राट पुष्यमित्र शुंग याने केलेल्या राजसूय यज्ञाचेही वर्णन आहे.