मिशन शक्ती

हा भारताचा, शत्रुचे भारतावर हेरगिरी करणारे उपग्रह नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक उपक्रम आहे.याने पृथ्वीच्या भोवतालच्या खालच्या कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट (एलईओ)) मध्ये फिरणारे कोणतेही उपग्रह नष्ट करता येऊ शकतात. या उपक्रमात, ए-सॅट (ॲंटी-सॅटेलाईट) क्षेपणास्त्र दागून दिनांक २७-०३-२०१९ रोजी परिक्षणादरम्यान एक उपग्रह नष्ट करण्यात आला.या प्रकारच्या क्षेपणास्त्राला बिएमडी इंटरसेप्टर मिसाईल असे संबोधण्यात येते.

ही क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशियाचीनने ही क्षमता अर्हित केली आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]