मी सिंधुताई सपकाळ | |
---|---|
मी सिंधुताई सपकाळ | |
दिग्दर्शन | अनंत महादेवन |
निर्मिती | बिंदिया खानोलकर |
प्रमुख कलाकार |
तेजस्विनी पंडित उपेंद्र लिमये ज्योती चांदेकर नीना कुलकर्णी चारुशीला साबळे |
संवाद | संजय पवार |
संगीत | अशोक पत्की |
पार्श्वगायन |
देवकी पंडित सुरेश वाडकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | शुक्रवार, नोव्हेंबर १९ २०१० |
मी सिंधुताई सपकाळ हा इ.स. २०१० साली प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट सिंधुताई सपकाळांच्या मी वनवासी नामक आत्मकथनात्मक पुस्तकावर आधारित आहे. अनंत महादेवन याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात सिंधुताई सपकाळांवर बेतलेली व्यक्तिरेखा तेजस्विनी पंडित हिने साकारली आहे.
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. |
चित्रपटाची सुरुवात सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौऱ्याने होते. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरून त्या प्रथमच विमान प्रवास करून अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅक तंत्राद्वारे होते. जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करून देतात. त्यातून त्यांनी जीवन जगताना दिलेल्या लढ्याची कथा उलगडत जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |