मुकुंदराज |
---|
मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.[१] [२] [३] [४]
परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस ५ कि.मी अंतरावर आहे. शहरात अमर हबीब यांनी स्थापन केलेले मुकुंदराज कविता ग्रंथालय आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)