या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मेरी एलायझा फुलरटन | |
---|---|
जन्म |
१४ मे, १८६८ |
मेरी एलायझा फुलरटन (१४ मे, १८६८ - २३ फेब्रुवारी, १९४६) ह्या ऑस्ट्रेलियन लेखिका होत्या.
फुलरटन ह्यांचा जन्म 14 मे 1868 रोजी ग्लेनमॅगी, व्हिक्टोरिया येथे झाला. [१] तिच्या आईने तिचे शिक्षण घरी आणि स्थानिक सरकारी शाळेत केले. शाळा सोडल्यानंतर ती विसाव्या वर्षी मेलबर्नला जाईपर्यंत तिच्या पालकांकडे राहिली. [२]
१८९० आणि १९०० च्या सुरुवातीपासून ती महिला मताधिकार चळवळीत सक्रिय होती. तिने पहिल्या महायुद्धादरम्यान स्त्रीवादी मुद्द्यांवर लेख लिहिले तसेच व्हिक्टोरियन प्रकाशनांसाठी भरतीच्या विरोधात युक्तिवाद केला. ती व्हिक्टोरियन सोशलिस्ट पार्टी आणि महिला राजकीय संघटना(वुमेन्स पॉलिटिकल असोसिएशन)ची सदस्य होती. [२] [१]
तिने १९१२मध्ये इंग्लंडला भेट दिली. १९२२ मध्ये ती तिच्या साथीदार मेबेल सिंगलटन सोबत तिथे राहायला गेली. [२] [३]
इंग्लंड मधील मॅरेसफील्ड येथे २३ फेब्रुवारी १९४६ रोजी फुलरटन यांचे निधन झाले. [२]
त्यांनी कधीकधी अल्पेनस्टॉक या टोपणनावाने मासिके आणि नियतकालिकांसाठी कथा, लेख आणि कडवे लिहिले. त्यांनी 1921 ते 1925 दरम्यान तीन कादंबऱ्या स्वतःच्या नावाने लिहिल्या. पण त्यांच्या मोल्स डू सो लिटल विथ देअर प्रायवसी आणि द वंडर आणि ऍपल,ह्या काव्यातील त्यांच्या शेवटच्या दोन कामांचे प्रकाशन, विद्यापीठात शिक्षण नसलेली एक स्त्री म्हणून त्यांच्याविरुद्ध पूर्वग्रह होण्याच्या भीतीने, ई टोपणनावाने प्रकाशित झाले. त्यांची मैत्रीण माइल्स फ्रँकलिनने त्यांच्या प्रकाशनाची व्यवस्था केली होती. त्यांची लेखिका म्हणून ओळख त्यांच्या मृत्यूनंतर उघड झाली. [३]