![]() मेहुली घोष | |||||||||||||||
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जन्मजात नाव | मेहुली घोष | ||||||||||||||
पूर्ण नाव | मेहुली घोष | ||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | ||||||||||||||
निवासस्थान | कोलकाता, भारत | ||||||||||||||
जन्मदिनांक | २० नोव्हेंबर, २००० | ||||||||||||||
जन्मस्थान | कल्याणी, पश्चिम बंगाल, भारत | ||||||||||||||
उंची | सेमी | ||||||||||||||
वजन | किग्रॅ | ||||||||||||||
खेळ | |||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||
खेळ | नेमबाजी | ||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | १० मी एर रायफल | ||||||||||||||
प्रशिक्षक | जयदीप कर्माकर | ||||||||||||||
|
मेहुली घोष (जन्म:२० नोव्हेंबर २०००, कल्याणी, पश्चिम बंगाल[१]) ही एक भारतीय नेमबाज आहे. तिने २०१६ च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत वयाच्या १६व्या वर्षी नऊ पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. [२]२०१७ मध्ये जपान येथील आशियाई एरगन स्पर्धेत तिने पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक पटकावले.[१] पश्चिम बंगालमध्ये जन्मलेली मेहुली ही भारतीय नेमबाजी संघातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक आहे.
लहानपणी टीव्हीवरील सी.आय.डी. ही मालिका आणि विविध अॅक्शनपट पाहून मेहुली गोळ्या-बंदुकांकडे आकर्षित झाली. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांच्या सुवर्ण पदक विजयातून तिने प्रेरणा घेतली आणि यातच व्यावसायिकरीत्या कारकीर्द घडवण्याचा निर्धार केला. [२]सुरुवातीला तिला सराव करण्यासाठी कोणतीही योग्य शूटिंग रेंज किंवा इलेक्ट्रॉनिक लक्ष्य (टार्गेट) अशी साधने उपलब्ध नव्हती. मग दोरीने काहीतरी जुगाड करून स्वतःसाठी लक्ष्य तयार करून त्यावरच सराव ती करू लागली.घोष एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढली. तिचे वडील रोजंदारीवर काम करत असत आणि आई गृहिणी होती. त्यामुळे तिच्या प्रशिक्षणादरम्यान कुटुंबीयांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण एवढे सगळे असूनही त्यांनी तिला पाठबळ दिले.२०१४ मधील एका घटनेमुळे मेहुली घोषला मोठा धक्का बसला. तिने झाडलेल्या एका गोळीमुळे चुकून एका व्यक्तीला दुखापत झाली. या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात झाला आणि ती नैराश्यात गेली.[३] मग तिच्या आईवडिलांनी तिला अर्जुन पुरस्कार विजेते जयदीप कर्माकर यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेण्यास पाठवले. या अकादमीपर्यंतचा प्रवास लांब आणि खडतर होता, त्यामुळे अनेकदा तिला घरी पोहोचण्यास मध्यरात्र होत असे. आजही आपल्या यशासाठी ती आईवडिलांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानते.
२०१६ची राष्ट्रीय चॅम्पियनशिप मेहुली घोषसाठी अविस्मरणीय ठरली. त्यात तिने ९ पदकांची कमाई करत भारतीय कनिष्ठ संघामध्ये आपली जागा पक्की केली. २०१७ मध्ये जपान येथे झालेल्या आशियाई एरगन स्पर्धेत तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदकाची कमाई केली. २०१८ मधील ब्यूनोस आयर्स येथे युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले. त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक व पुढे विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. [४]हे तिचे सीनियर गट वर्ल्ड कपमधील पदार्पण होते. तिने महिलांच्या १० मी. एर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून जागतिक विक्रम नोंदविला. २०१९ च्या नेपाळमधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले जे सध्याच्या विश्वविक्रमापेक्षा उल्लेखनीय होते.[५] २०२० च्या स्पोर्टस्टार अॅसेस अवॉर्ड्समध्ये घोष तिला "फीमेल यंग अॅथलीट ऑफ दी इयर" या पुरस्काराने सन्मानित व गौरविण्यात आले.[६]