हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
विकिपीडिया शहर म्हणजेच जगातील कुठलेही एक असे शहर की ज्या शहरातील कोणत्याही दखलपात्र विभागाची सर्व माहिती त्या शहरातील क्यूआर संकेतांच्या[१] माध्यमातून स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते.
युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतातील मॉन्मथशायर या विभागात असणारे मॉन्मथ हे शहर येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक २६ मे, २०१२ रोजी जगातील पहिले विकिपीडिया शहर बनणार आहे.[२][३][४]. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्स यांनी मॉन्मथसारखीच अनेक विकिपीडिया शहरे निर्माण होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला आहे.