यशवंत दिनकर फडके | |
---|---|
जन्म नाव | यशवंत दिनकर फडके |
जन्म |
जानेवारी ३, १९३१ सोलापूर, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
जानेवारी ११, २००८ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व |
![]() |
कार्यक्षेत्र | साहित्य, इतिहास |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | चरित्रलेखन |
विषय | इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | विसाव्या शतकातील महाराष्ट्र |
स्वाक्षरी |
![]() |
यशवंत दिनकर फडके (साधारणपणे यदि म्हणून ओळखले जाणारे) (जन्म : सोलापूर, ३ जानेवारी १९३१; - ११ जानेवारी २००८) हे एक मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते. ते २००० साली बेळगाव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
फडक्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडक्यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरिभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. हे शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून त्यांनी लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी १९५१ साली बी.ए. व १९५३ साली एम्.ए. या पदव्या मिळाल्या. पुढे १९७३ साली ते मुंबई विद्यापीठाचे पीएच्.डी.धारक झाले.
१९७० ते १९९७ ह्या थोड्या-अधिक कालखंडात यदिंनी खेळलेल्या काही वादांचे संकलन पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहे. त्या पुस्तकातील वाद वैचारिक आहेत. ते खेळणाऱ्या व्यक्ती विद्याव्यासंगी आहेत. फक्त त्यांचे दृष्टिकोन भिन्न आहेत. वाद हे भारतीय संस्कृतीला नवीन नाहीत. द्वैत, द्वैताद्वैत, चार्वाक इत्यादी वाद पूर्वी खेळले गेले. साहित्यिक वादही खेळले गेले. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले वाद नित्य खेळले जात असतातच. वाचन व व्यासंग यामुळेच या वादांत भाग घेणाऱ्या व्यक्ती एकमेकांसमोर ठाकल्या. त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. मात्र विचारांचा मुकाबला विचारानेच करायचा हा विचार यामध्ये ठाम दिसून येतो. डॉ. अरुण टिकेकरांनी हंटरवाले फडके हे मार्मिक विशेषण यदिंसाठी वापरले आहे. या वादात उत्तरे प्रत्युत्तरे झडली. कधी लिहिणाऱ्यांचा तोल गेला. मात्र त्यांतून त्या त्या विषयाचे भिन्न पैलू जसे समोर आले तसेच वाद खेळणाऱ्यांचे वादकौशल्यही प्रकट झाले. 'वाद प्रतिवाद-य.दि. फडके' हे वेगळ्या पठडीतले पुस्तक या संकलनातून सिद्ध झाले आहे.पुस्तकाचे संपादन डाॅ. वासंती फडके यांनी केले आहे. प्रकाशक - अक्षर प्रकाशन.