ये काली काली आंखे ही सिद्धार्थ सेनगुप्ता यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केलेली नेटफ्लिक्स वरील एक भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक क्राईम थ्रिलर स्ट्रीमिंग दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत ताहिर राज भसीन, श्वेता त्रिपाठी आणि आंचल सिंग मुख्य भूमिकेत असून सौरभ शुक्ला, सूर्या शर्मा, अरुणोदय सिंग आणि ब्रिजेंद्र काला सहाय्यक भूमिकेत आहेत.[१][२] मालिका दुसऱ्या सीझनसाठी नूतनीकरण करण्यात आली आहे. ये काली काली आंखे १४ जानेवारी २०२२ रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज झाली.[३][४]