योगेश चंदर देवेश्वर | |
आयटीसी लिमिटेड चे कार्यकारी अध्यक्ष व सीईओ
| |
कार्यकाळ १ जानेवारी १९९६ – ४ फेब्रुवारी २०१७ | |
जन्म | ४ फेब्रुवारी, १९४७ लाहोर, ब्रिटिश भारत |
---|---|
मृत्यू | ११ मे, २०१९ (वय ७२) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
निवास | कोलकाता, भारत |
गुरुकुल | आय आय टी दिल्ली |
व्यवसाय | उद्योजक |
योगेश चंदर देवेश्वर (४ फेब्रुवारी १९४७ - ११ मे २०१९) हा एक भारतीय उद्योजक होता. ते आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष होते. त्यांचा सीईओ पदाचा कार्यकाळ (२३ वर्षे) हा भारतातील ईतर कोणत्याही कंपनीच्या तुलनेत सर्वात लांब कार्यकाळ होता. याच बरोबर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक, राष्ट्रीय फाउंडेशन फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे सदस्य आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चचे संचालक होते.
योगेश चंदर देवेश्वर यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९४७ रोजी लाहोर येथे झाला.[१] १९६८ मध्ये त्यांनी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली [२] . त्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूलमध्ये सहा आठवड्यांच्या प्रगत व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.[२]
१९६८ मध्ये देवेश्वर आयटीसी लिमिटेडमध्ये सामील झाले. १९८४ मध्ये ते मुख्य संचालक म्हणून नियुक्त झाले आणि जानेवारी १९९६ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष झाले.[३]. २०१० मध्ये देवेश्वर आयटीसीचे प्रमुख हे पद सोडणार होते.[४]