भारतीय व्यापारी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १८५६ नवसारी | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १९२६ पॅरिस | ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वडील |
| ||
आई |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार | |||
| |||
रतनजी दादाभॉय टाटा तथा आर.डी. टाटा (१८५६-१९२६) हे एक भारतीय व्यापारी होते ज्यांनी भारतातील टाटा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते भारतातील अग्रगण्य उद्योगपती आणि टाटा सन्सचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे चुलत भाऊ होते.[१] जमशेटजी टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा सन्समधील भागीदारांपैकी ते एक होते. रतनजी हे जे.आर.डी. टाटा यांचे वडील होते.[२][३]
रतनजी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी येथे १८५६ मध्ये झाला. त्यांनी कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि बॉम्बे येथील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी मद्रासमध्ये कृषी विषयाचा कोर्स केला. त्यानंतर ते सुदूर पूर्वेतील आपल्या कौटुंबिक व्यापारात सामील झाले.
रतनजींचे लग्न लहान वयातच पारसी मुलीशी झाले होते. तथापि, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या पत्नीचा अपत्यहीन मृत्यू झाला. रतनजी चाळीशीत होते जेव्हा त्यांनी 1902 मध्ये सुझान ब्रिएर या फ्रेंच महिलेशी पुनर्विवाह केला. त्यांच्या काळात हे क्रांतिकारक मानले जात असे आणि पारशी समाजातील काहींनी त्याचे स्वागत केले नाही. त्यांना रोदाबेह, जहांगीर, जिमी, सिला आणि दोराब अशी पाच मुले होती.[४]
टाटा अँड कंपनी या नावाने रतनजी चीनमध्ये अफूच्या आयातीचा व्यवसाय चालवत होते, जो त्यावेळी कायदेशीर होता.[५] 1887 मध्ये, त्याने आणि डेव्हिड सॉलोमन ससून सारख्या इतर व्यापाऱ्यांनी अफूच्या व्यापाऱ्यांच्या वतीने हाँगकाँग विधान परिषदेच्या विधेयकाबद्दल तक्रार करण्यासाठी याचिका सादर केली ज्यामुळे त्यांच्या व्यापारावर परिणाम होण्याची भीती होती.[६][७]
टाटा स्टीलची संकल्पना जमशेटजी टाटा यांनी मांडली होती आणि ती सुरू देखील केली होती. मात्र, प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच जमशेटजींचे निधन झाले. जमशेदजींचा मुलगा दोराब याच्यासमवेत टाटा स्टील प्रकल्प पूर्ण करण्यात रतनजींनी महत्त्वाची भूमिका बजाबवली आणि अशा प्रकारे जमशेदपूरमध्ये टाटा स्टीलची स्थापना झाली.
पहिल्या महायुद्धात टाटांनी ब्रिटीशांना पोलाद पुरवठा केला. तथापि, युद्धानंतर टाटा स्टील 1920च्या दशकात कठीण काळात गेली कारण ब्रिटन आणि बेल्जियममधून स्टील भारतात टाकण्यात आले. रतनजी, इतर संचालकांसह भारतीय पोलाद उद्योगाला तत्कालीन वसाहतवादी सरकारकडून संरक्षण मिळवून दिले आषणि टाटा स्टीलचे कामकाज स्थिर केले.