रमेश काशीराम कराड हे महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत[१]. ते भारतीय जनता पार्टी, लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत.२०२० मध्ये ते नगरसेवक झाले.
कराड यांचा जन्म लातूर तालुक्यातील रुई रामेश्वर गावात हिंदू कुटुंबात झाला. त्यांना आप्पा म्हणून ओळखले जाते.[२]
कराड यांनी आपल्या मूळ लातूर ग्रामीण भागातून निवडणूक लढविली. मुंडे यांच्या निधनानंतर कराड यांनी लातूर ग्रामीण भागात पक्ष जिवंत ठेवला. २००९ मधील महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली, त्यामध्ये रमेश यांना २३५०० मते मिळाली. २०२० मध्ये त्यांनी बिनविरोध नगरपरिषदेची निवडणूक जिंकली आणि प्रथमच विधिमंडळात प्रवेश केला[३].