रमेश बैस

रमेश बैस (२ ऑगस्ट १९४७) हे सध्या महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.[] या नियुक्तीपूर्वी, बैस २०२१ ते २०२३ पर्यंत झारखंडचे राज्यपाल आणि २०१९ ते २०२१ पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल होते.[][] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यासह त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत विविध राजकीय पदांवर काम केले आहे. १९८९ मध्ये रायपूरमधून ९व्या लोकसभेचे सदस्य म्हणून ते पहिल्यांदा भारतीय संसदेत निवडून आले आणि ११व्या (१९९६), १२व्या (१९९८), १३व्या (१९९९), १४व्या (२००४), १५व्या (२००९) आणि १६व्या (२०१४) लोकसभेपर्यंत सलगपणे पुन्हा निवडून आले. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभेवर बैस एकूण सात वेळा निवडून आले आहेत.

रमेश बैस यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.[][]

श्री. रमेश बैस

विद्यमान
पदग्रहण
१३ फेब्रुवारी २०२३
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मागील भगतसिंग कोश्यारी

कार्यकाळ
१३ जुलै २०२१ – १२ फेब्रुवारी २०२३
मागील द्रौपदी मुर्मू

कार्यकाळ
२९ जुलै २०१९ – ६ जुलै २०२१
मागील कप्तानसिंग सोळंकी
पुढील सत्यदेव नारायण आर्य

कार्यकाळ
१९९६ – २३ मे २०१९
मागील विद्या चरण शुक्ला
पुढील सुनील कुमार सोनी
मतदारसंघ रायपूर
कार्यकाळ
१९८९ – १९९१
मागील केयुर भूषण
पुढील विद्या चरण शुक्ला

जन्म २ ऑगस्ट, १९४७ (1947-08-02) (वय: ७७)
रायपूर
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी श्रीमती. रमाबाई
अपत्ये
शिक्षण वाणिज्य शाखेत पदवी
धर्म हिंदू

वैयक्तिक जीवन

[संपादन]

रमेश खोमलाल बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर, मध्य प्रदेश (आता छत्तीसगडमध्ये) झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळमध्ये झालं. १ मे १९६८ रोजी त्यांनी रामबाई यांच्याशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. बैस हे व्यवसायाने शेतकरी आहेत.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

राज्यस्तरीय

[संपादन]
  • १९७८: नगरसेवक, महानगरपालिका, रायपूर
  • १९८०-८५: आमदार, मध्य प्रदेश विधानसभा
  • १९८०-८२: सदस्य, अंदाज समिती, मध्य प्रदेश विधानसभा
  • १९८२-८५: सदस्य, ग्रंथालय समिती, मध्य प्रदेश विधानसभा
  • १९८२-८८: प्रदेश मंत्री, भारतीय जनता पक्ष, मध्य प्रदेश
  • १९८५ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचे काँग्रेस प्रतिस्पर्धी सत्यनारायण शर्मा यांच्याकडून पराभूत.

राष्ट्रीय

[संपादन]
  • १९८९: नवव्या लोकसभेचे सदस्य (खासदार) म्हणून ते पहिल्यांदा भारतीय संसदेत निवडून आले
  • १९८९-९० आणि १९९४-९६: उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, मध्य प्रदेश
  • १९९०-९७: सदस्य, लोकलेखा समिती सदस्य, सल्लागार समिती, पोलाद आणि खाण मंत्रालय
  • १९९३ नंतर: सदस्य, राष्ट्रीय कार्यकारिणी, भारतीय जनता पक्ष
  • १९९४ नंतर: सदस्य, कार्यकारी समिती, भारतीय जनता पक्ष, मध्य प्रदेश
  • १९९६: ११व्या लोकसभेसाठी निवडून आले (दुसऱ्यांदा)
    • सदस्य, कृषी समिती
    • सदस्य, याचिका समिती
    • सदस्य, सल्लागार समिती, उद्योग मंत्रालय
  • १९९९: १३व्या लोकसभेसाठी निवडून आले (चौथ्यांदा)
  • १३ ऑक्टोबर १९९९ - ३० सप्टेंबर २०००: केंद्रीय राज्यमंत्री, रसायने आणि खते
  • ३० सप्टेंबर २००० - २९ जानेवारी २००३: केंद्रीय राज्यमंत्री, माहिती आणि प्रसारण
  • २९ जानेवारी २००३- ८ जानेवारी २००४: केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), खाण मंत्रालय
  • ९ जानेवारी २००४ - मे २००४: केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पर्यावरण आणि वन मंत्रालय
  • २००४: १४व्या लोकसभेसाठी निवडून आले (पाचव्यांदा)
    • सदस्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती
    • सदस्य, लोकलेखा समिती
    • सदस्य, सल्लागार समिती, ऊर्जा मंत्रालय
    • सदस्य, हिंदी सलाहकार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालय
  • ५ ऑगस्ट २००७ पासून: सदस्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती
  • १ मे २००८: सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती
  • २००९: १५व्या लोकसभेसाठी निवडून आले (सहाव्यांदा)
  • २००९-२०१४: लोकसभेतील मुख्य व्हीप (भाजप)
  • ६ ऑगस्ट २००९: सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती
  • ३१ ऑगस्ट २००९: सदस्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती
  • २३ सप्टेंबर २००९: सदस्य, नियम समिती
  • १ मे २०१०: सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती
  • २०१४: १६व्या लोकसभेसाठी निवडून आले (सातव्यांदा)
  • सप्टेंबर २०१४- मे, २०१९: सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

राज्यपाल

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Marathi, TV9 (2023-02-12). "महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? देशात कुठे कोण झाले राज्यपाल, पाहा". TV9 Marathi. 2023-02-12 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.uniindia.com/governor-designate-ramesh-bais-reaches-ranchi-to-take-oath-on-wednesday/east/news/2448229.html
  3. ^ "Tripura On Road To Development, Says Outgoing Governor Ramesh Bais". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2022-01-19 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  4. ^ author/online-lokmat (2023-02-12). "भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा अखेर मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल". Lokmat. 2023-02-12 रोजी पाहिले.
  5. ^ "महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?".
  6. ^ "Rajbhawan". rajbhavanjharkhand.nic.in. 2023-02-12 रोजी पाहिले.
  7. ^ "कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात नवे राज्यपाल; रमेश बैस यांची राजकीय कारकीर्द". Maharashtra Times. 2023-02-12 रोजी पाहिले.