राकेश झुनझुनवाला | |
---|---|
जन्म |
राकेश झुनझुनवाला ५ जुलै, १९६० हैदराबाद, आंध्रप्रदेश (आताचे तेलंगणा) |
मृत्यू |
१४ ऑगस्ट, २०२२ (वय ६२) मुंबई, महाराष्ट्र |
निवासस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | चार्टर्ड अकाउंटंट |
प्रशिक्षणसंस्था |
|
पेशा | गुंतवणूकदार |
जोडीदार | रेखा झुनझुनवाला |
अपत्ये | ३ |
राकेश झुनझुनवाला (५ जुलै १९६० - १४ ऑगस्ट २०२२)[१] हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती, शेअर मार्केट व्यापारी आणि गुंतवणूकदार होते. रेअर एंटरप्रायझेस या त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीमध्ये ते भागीदार आणि व्यवस्थापक होते. [२][३]
झुनझुनवाला मुंबईत एका राजस्थानी कुटुंबात वाढले, जिथे त्यांचे वडील आयकर आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांनी सिडनहॅम कॉलेज[४] मधून पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला.[ संदर्भ हवा ]
झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफेट म्हणले जायचे. राकेश झुनझुनवाला हे स्वतः चार्टड अकाउंटंट होते. १९८५ मध्ये वयाच्या पंचविशी पासून शेअर मार्केट मध्ये ५००० रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली आणि वयाच्या ६२ व्य वर्षीपर्यंत त्यांनी शेअर मार्केट मधून तब्बल ४७००० कोटीं पेक्षा जास्त संपत्ती जमवली होती. फोर्ब्स च्या सर्वे नुसार राकेश झुनझुनवाला हे भारतातील ३६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.[ संदर्भ हवा ]
१९८६ साली राकेश झुनझुनवाला यांनी टाटा टी कंपनीचे ५००० शेअर्स ४३ रुपयांना विकत घेतले, आणि ३ महिन्यात त्या शेअर्स ची किंमत १४३ रुपये झाली. ३ महिन्यात त्यांना तिप्पट नफा झाला.[ संदर्भ हवा ]
राकेश झुनझुनवाला यांना मधुमेह आणि क्रोनिक किडनी डिसीज होता आणि नुकतीच(?) त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली होती.[ संदर्भ हवा ]