राजधानी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात.
इ.स. १९६९ सालापासून सुरू असलेली राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठेच्या रेल्वेंपैकी एक मानली जाते. सर्व राजधानी एक्सप्रेस गाड्या जलदगती असून त्यांचे डबे विशेष आरामदायक असतात. सर्व डबे वातानुकुलीत असतात व प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.
सध्या एकूण २२ राजधानी एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत.