नाराह ह्या गुवाहाटी विद्यापीठाच्या पदवीधर आहेत.[१] आसाम राज्य संघाची कर्णधार म्हणून त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळला आहे.[२] २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) मध्ये विलीन होईपर्यंत त्या भारतीय महिला क्रिकेट असोसिएशन (WCAI) च्या अध्यक्षा होत्या.[३] बीसीसीआयच्या महिला समितीच्या त्या सदस्य होत्या. [३] नाराह यांनी आसाम महिला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आसाम क्रिकेट असोसिएशन आणि आसाम फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.[४][५][६]
नाराह यांची १९९८ मध्ये त्यांच्या वयाच्या ३३ च्या वर्षी आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. [१] त्याच वर्षी त्या लखीमपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. १९९९ आणि २००९ मध्ये त्या लखीमपूरमधून पुन्हा निवडून आल्या.[१] नाराह यांची २००३ मध्ये भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय परिषदेवर निवड झाली. [७] २००९ मध्ये त्यांची लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उपमुख्य व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [८] २०१२ मध्ये, नाराह यांचा भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातआदिवासी व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. [९] २०१६ मध्ये नाराह हे आसाममधून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. [१०]
आसाम विधानसभेचे सहावेळा सदस्य आणि आसाम सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री, भरत नाराह यांच्याशी राणी यांचा विवाह झाला आहे.[२][११]