राष्ट्रीय महामार्ग १०

राष्ट्रीय महामार्ग १०
Map
राष्ट्रीय महामार्ग १० चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी १७४ किलोमीटर (१०८ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात गंगटोक, सिक्कीम
शेवट सिलिगुडी, पश्चिम बंगाल
स्थान
राज्ये सिक्कीम, पश्चिम बंगाल

राष्ट्रीय महामार्ग १० (National Highway 10) हा भारताच्या ईशान्य भागातील एक छोटा महामार्ग आहे. सुमारे १७४ किमी लांबीचा हा महामार्ग सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोकला पश्चिम बंगालमधील सिलिगुडी ह्या शहरासोबत जोडतो. हा महामार्ग तीस्ता नदीच्या काठाजवळून धावतो. कालिंपाँग, रंगपो, पाक्योंग ही प्रमुख नगरे राष्ट्रीय महामार्ग १० द्वारे जोडली गेली आहेत. २०१० पूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३१ए ह्या नावाने ओळखला जात असे.