राहुल सुरेश नार्वेकर | |
१७ वे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा
| |
विद्यमान | |
पदग्रहण ३ जुलै २०२२ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
मुख्यमंत्री | एकनाथ शिंदे |
डेप्युटी | नरहरी झिरवळ |
विद्यमान | |
पदग्रहण २१ नोव्हेंबर २०१९ | |
मतदारसंघ | कुलाबा |
जन्म | ११ फेब्रुवारी, १९७७ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष (२०१८ पासून) |
मागील इतर राजकीय पक्ष | राष्ट्रवादी (२०१४-१९) शिवसेना (२०१४ पर्यंत) |
व्यवसाय | वकीली |
राहुल नार्वेकर (जन्म: ११ फेब्रुवारी १९७७) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे १७ वे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.[१][२]
राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात ही शिवसेनेपासून झाली. शिवसेनेत ते प्रवक्तेपदावर होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २०१४ साली त्यांना विधान परिषदेवर आमदर म्हणून पाठवलं होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये सामील झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ते भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.[३]
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपकडून नगरसेवक आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत.[४]