राहुल मिश्रा

राहुल मिश्रा (जन्म ७ नोव्हेंबर १९७९.- मल्हौसी, कानपूर) एक भारतीय फॅशन डिझायनर आहे.२०१४ मध्ये मिलान फॅशन वीकमध्ये आंतरराष्ट्रीय वूलमार्क पारितोषिक जिंकला.२००८ मध्ये त्यांना एमटीव्ही इंडियाने एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.[]

शिक्षण

[संपादन]

राहूल यांनी कानपूर विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी संपादन केली. अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधून परिधान डिझाईनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.[]

कारकीर्द

[संपादन]

२००६ मध्ये केरळमधील सूती हातमाग कापडांच्या संग्रहातून त्याने लेक्मे फॅशन वीकमध्ये पदार्पण केले. मिश्राने लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया येथे फॅशन आठवड्यात आपले काम दाखविले आहे आणि पॅरिस फॅशन वीकच्या अधिकृत कॅलेंडरवर नियमित आहे. २०१३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय वूल्मार्क पुरस्काराचा भारतीय लेग जिंकला. फेब्रुवारी २०१४ मध्ये राहुल मिश्रा यांनी वूलमार्क पुरस्कार जिंकला. मिलान फॅशन वीक.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Aggarwal, Asmita (2014-02-22). "Business Standard India".
  2. ^ Khan, Parizaad (2008-08-09). "Rahul Mishra / Fashion designer". mint (इंग्रजी भाषेत). 2021-02-24 रोजी पाहिले.
  3. ^ "Rahul Mishra, The Craftsman | Forbes India". Forbes India (इंग्रजी भाषेत). 2020-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-02-24 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

राहुल मिश्रा बीओएफ प्रोफाइल