रुमाना अहमद (बांग्ला: রুমানা আহমেদ) (२९ मे, इ.स. १९९१:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते.
तिने २६ नोव्हेंबर २०११, रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, तर २८ ऑगस्ट २०१२ रोजी आयर्लंडविरुद्धच आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. क्वांगचौ, चीन येथे पार पडलेल्या २०१० आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेत्या संघाची रुमाना ही एक सदस्य होती. बांगलादेशचा संघ अंतिम सामना चीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध खेळला.[३][४]