रॉकेट्री: द नंबी इफेक्ट | |
---|---|
दिग्दर्शन | आर. माधवन |
निर्मिती | आर. माधवन |
कथा | आर. माधवन |
प्रमुख कलाकार |
• आर. माधवन • सिमरन • रजित कपूर • रवी राघवेंद्र • मीशा घोषल • श्याम रंगनाथन • गुलशन ग्रोव्हर |
देश |
![]() |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १ जुलै २०२२ |
अवधी | १५७ मिनिटे |
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हेरगिरीचा आरोप असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी वैज्ञानिक आणि एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा भारतीय चरित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शन आर. माधवन यांनी केले असून, यात सिमरन यांच्यासह मुख्य भूमिकेत ते स्वतः आहेत.[१][२]
या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी, तमिळ आणि इंग्लिश भाषेत एकाच वेळी केले गेले आहे. तसेच तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या कथेची सुरुवात प्रिन्स्टन विद्यापीठात पदवीधर विद्यार्थी असलेल्या युवा नंबी नारायणनच्या काळापासून होते. या चित्रपटावर इ.स. २०१७ च्या सुरुवातीस प्री-प्रॉडक्शन काम सुरू झाले आणि १ जुलै २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.[३]
नंबी नारायणन या थोर रॉकेट वैज्ञानिकाची ही कथा आहे.
जगन