लक्ष्मी एन. मेनन

Lakshmi N. Menon (es); লক্ষ্মী এন মেনন (bn); Lakshmi N. Menon (hu); Lakshmi Menon (ca); Lakshmi N. Menon (yo); Lakshmi N. Menon (de); ଲକ୍ଷ୍ମୀ ଏନ. ମେନନ (or); Lakshmi N. Menon (ga); Lakshmi N. Menon (sl); ലക്ഷ്മി എൻ മേനോൻ (ml); Lakshmi N. Menon (nl); लक्ष्मी एन मेनन (hi); ಲಕ್ಷ್ಮೀ ಎನ್. ಮೆನನ್ (kn); ਲਕਸ਼ਮੀ ਐਨ. ਮੈਨਨ (pa); Lakshmi N. Menon (en); Lakshmi N. Menon (fr); लक्ष्मी एन. मेनन (mr); இலட்சுமி என். மேனன் (ta) política india (es); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); femme politique indienne (fr); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); India poliitik (et); politikari indiarra (eu); politikane indiane (sq); política india (1899–1994) (ast); política índia (ca); Indian politician (en); indische Politikerin (de); política indiana (pt); Indian politician (en-gb); سیاستمدار هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); سياسية هندية (ar); Indian politician (en); indisk politiker (da); indisk politiker (sv); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്‍ത്തക (ml); Indiaas politica (1899-1994) (nl); індійський політик (uk); भारतीय राजनेता (hi); polaiteoir Indiach (ga); פוליטיקאית הודית (he); política india (gl); Indian politician (en-ca); politica indiana (it); மலையாள எழுத்தாளர் (ta) राज्य मंत्री (hi); লক্ষ্মী এন. মেনন, লক্ষ্মী মেনন (bn)
लक्ष्मी एन. मेनन 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमार्च २७, इ.स. १८९९
तिरुवनंतपुरम
मृत्यू तारीखनोव्हेंबर २०, इ.स. १९९४
नागरिकत्व
व्यवसाय
सदस्यता
  • National Flag Presentation Committee (इ.स. १९४७)
राजकीय पक्षाचा सभासद
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

लक्ष्मी एन. मेनन (२७ मार्च १८९९ [] – ३० नोव्हेंबर १९९४ [] ) ह्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. १९६२ ते १९६६ या काळात त्या राज्यमंत्री होत्या. []

प्रारंभिक जीवन

[संपादन]

लक्ष्मी मेननचा जन्म त्रिवेंद्रममध्ये रामा वर्मा थम्पन आणि माधवीकुट्टी अम्मा यांची घरी १८९९ मध्ये झाला. १९३० मध्ये, त्यांनी प्रोफेसर व्ही.के. नंदन मेनन यांच्याशी विवाह केला. नंदन मेनन हे नंतर १९५०-५१ मध्येत्रावणकोर विद्यापीठाचे कुलगुरू बनले आणि पाटणा विद्यापीठाचे, तसेच भारतीय लोक प्रशासन संस्थेचे संचालक होते.[]

कारकीर्द

[संपादन]
मेनन (पुढील पंक्ती, खूप डावीकडे) व्हाईट हाऊसमध्ये राज्य भोजनाला उपस्थित, ३ जून १९६३.

१९५२ ते १९६६ या काळात लक्ष्मी राज्यसभा सदस्य होत्या [] . १९५२ ते १९५७ त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात संसदीय सचिव म्हणून, १९५७ ते १९६२ पर्यंत उपमंत्री आणि १९६६ पर्यंत राज्यमंत्री म्हणून काम केले.[]

१९६७ मध्ये राजकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर, त्या सामाजिक कार्याकडे वळाल्या आणि लेखन पण सुरू केले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या ऑक्सफर्ड पॅम्प्लेट्स ऑन इंडियन अफेयर्स मालिकेसाठी भारतीय महिलांवरी त्यांनी पुस्तक लिहिले.भारतामध्ये फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. [] त्यांच्या सेवांची दखल घेऊन, त्यांना १९५७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या मल्याळी होत्या. []

मेनन यांनी राजकारणानंतर त्यांचे सक्रिय जीवन राष्ट्रहितासाठी समर्पित केले. त्यांनी अनेक वर्षे अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा म्हणून काम केले. मोरारजी देसाई यांच्यासमवेत त्या अखिल भारतीय दारूबंदी परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या. १९८८ मध्ये, त्यांनी एपी उदयभानू आणि जॉन्सन जे. एडायरनमुला यांच्यासोबत अल्कोहोल अँड ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर (एडीआयसी)-इंडियाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी अखिल भारतीय महिलांमधील निरक्षरता निर्मूल समितीचे अध्यक्षा आणि १९७२ ते १९८५ या काळात कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षा म्हणूनही काम केले. []

त्रिवेंद्रम येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन उभारताना गुंतलेली नोकरशाही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लक्ष्मी मेनन यांचा नेहरू सरकारमधील राज्यमंत्री म्हणून कार्यकाळ महत्त्वपूर्ण ठरला. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Rajya Sabha members biographical sketches 1952 – 2003. rajyasabha.nic.in.
  2. ^ IASSI Quarterly, Volume 15. Indian Association of Social Science Institutions, 1996.
  3. ^ a b Women Members of the Rajya Sabha. Rajya Sabha Secretariat. New Delhi, 2003.
  4. ^ "University of Kerala, Thiruvananthapuram". way2universities.com. 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 March 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Bālā, U.; Sharma, A. (1986). Indian Women Freedom Fighters, 1857–1947 (जर्मन भाषेत). Manohar. p. 74. ISBN 9788185054131. 2020-07-31 रोजी पाहिले. She was the Founder – member of the All – India Women ' s Conference, and of the Federation of University Women .
  6. ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
  7. ^ Annual Report 2014-15. Kasturba Gandhi National Memorial Trust.
  8. ^ "Remembering the guiding light". www.deccanchronicle.com. 2020-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-26 रोजी पाहिले.