ललिताम्बिक अन्तर्जनम | |
---|---|
टोपणनाव | ललिताम्बिक नंबूथिरी |
जन्म |
३० मार्च, १९०९ पुनालूर, कोल्लम, भारत |
मृत्यू |
६ फेब्रुवारी, १९८७ (वय ७७) नजालियाकुझी, कोट्टायम जिल्हा, केरळ, भारत |
भाषा | मल्याळम |
अपत्ये | भास्कर कुमार, एन. मोहनन, लीला, शांता, राजम, मणी, राजेंद्रन |
ललिताम्बिक अन्तर्जनम (३० मार्च १९०९ - ६ फेब्रुवारी १९८७) या एक भारतीय लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. त्यांच्या मल्याळम भाषेतील साहित्यकृतींसाठी त्या प्रसिद्ध होत्या. व्ही.टी. भट्टाथिरीपाटू[१] यांच्या नेतृत्वाखालील नंबुथिरी जातीतील महात्मा गांधी आणि सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचे लिखाण समाजात, कुटुंबात आणि एक व्यक्ती म्हणून महिलांच्या भूमिकेबद्दल संवेदनशीलता दर्शवते. त्यांच्या प्रकाशित लेखात लघुकथांचे नऊ खंड, सहा कवितासंग्रह, मुलांसाठी दोन पुस्तके आणि एक कादंबरी, अग्निसाक्षी (१९७६) आहे. ज्याला १९७७ मध्ये केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार आणि केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे आत्मचरित्र आत्मकधक्कोरु आममुखम (आत्मचरित्राचा परिचय) हे मल्याळम साहित्यातील महत्त्वपूर्ण कार्य मानले जाते.
ललिताम्बिक अन्तर्जनम यांचा जन्म ३० मार्च १९०९ रोजी दक्षिण भारतातील केरळ राज्यातील पुनालूर, कोल्लम जिल्ह्यातील कोट्टावट्टोम येथे एका सनातनी कुटुंबात झाला. . त्यांचे पालक कोट्टावट्टाथु इल्लाथु दामोदरन नंबूथिरी आणि चंगारप्पिल्ली मनयक्कल अरविक्कल अरविक्कल होते.[२] त्यांचे औपचारिक शिक्षण थोडेच होते. तथापि, त्यांच्या वडिलांनी एका खाजगी शिक्षकाची नियुक्ती करून त्यांना शिकवले. त्या वेळेस अशी पद्धत फारशी रुढ नव्हती.[३]
त्या केरळमधील सर्वात शक्तिशाली भूधारक ब्राह्मण जातीचा भाग होत्या. तरी ललिताम्बिकांचे जीवन-कार्य म्हणजे नंबुदिरी समाजात स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या ढोंगीपणा, हिंसाचार आणि अन्यायाचा पर्दाफाश आणि नाश करणे हे होते. त्यांना शाळेत शिकण्याची परवानगी नव्हती. त्यांना चालू घडामोडींबद्दल त्यांच्या कुटुंबातील प्रेमळ पुरुष नातेवाईकांवर अवल्ंबून रहावे लागत होते. त्यांना चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल फारच थोडेसे माहित होते. त्यांना त्यात भाग घेण्याची इच्छा होती. १९२६ मध्ये, शेतकरी नारायणन नंबुदिरी यांच्याशी विहित पद्धतीने त्यांचा विवाह झाला.[४] एक पत्नी झाल्यानंतर त्यांचा बाह्य जगाशी सर्व संपर्क तुटला होता. त्यांचा दिवस धुरकट स्वयंपाकघर आणि ओलसर बंद अंगणांमध्ये कठोर शारीरिक श्रम करण्यात जात होता. क्लॉस्ट्रोफोबिक दिनचर्या, क्षुल्लक घरगुती राजकारण आणि अशाच कैदेत असलेल्या इतर स्त्रियांच्या भीती आणि मत्सराचा समावेश होता. पण त्यांनी त्यांच्या जीवनातील अनैसर्गिक परिस्थिती असूनही त्यांचे धैर्य आणि मानव बनण्याचा त्यांचा निर्धार देखील पाहिला. त्या वेळेस त्यांचे लेखन त्यांच्या मदतीला आले.ते त्यांनी गुप्तपणे सुरू ठेवले होते. पहाटेच्या आधी सुरू झालेल्या कामाच्या दिवसाच्या शेवटी, त्या आपल्या मुलांना झोपवायच्या, दार लावायच्या आणि एका लहान दिव्याच्या प्रकाशात लिहायच्या. धुराचा सतत संपर्क आणि अपुरी प्रकाश यामुळे त्यांचे डोळे खराब होऊ लागले. वेदना खूप वाढल्या की त्या डोळे मिटून लिहायच्या. त्यांच्या जातीच्या इतर बहिणींची निराशा आणि अधःपतन यामुळे ललितांबिका यांना त्यांच्या प्रसिद्ध मल्याळम कादंबरी अग्निसाक्षी (फायर बीइंग द विटनेस) मध्ये त्यांची दुर्दशा लिहिण्यास प्रवृत्त केले.[५] या कादंबरीवर नंतर १९९७ मध्ये त्याच नावाने एक चित्रपट बनवण्यात आला.