लव कुश | |
---|---|
Broadcast | |
External links | |
Official website |
लव कुश ही भारतीय दूरदर्शनवरील रामानंद सागर निर्मित, लिखित आणि दिग्दर्शित एक पौराणिक मालिका आहे. [१] हा एक रामायणानंतरचा काळ आहे, ज्यामध्ये मुख्यत: आधीचे कलाकार आणि निर्माते आहेत. [२] प्राचीन भारतीय माहाकाव्य रामायणाच्या उत्तरा कांडा मध्ये लव कुश यांचा शेवटच्या अध्यायामध्ये समावेश आहे. या अध्यायात श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतरच्या काळात रामाकडे आलेल्या जुळी मुले लव कुश यांची कथा आहे. [३]
भारतामधील कोरोनाव्हायरसमुळे २०२० सालच्या संचारबंदीच्या काळात, रामायण ह्या कार्यक्रमाचे ४४ भाग दूरदर्शनच्या नॅशनल चॅनेलवर १९ एप्रिल २०२० ते ०२ मे २०२० दरम्यान पुनःप्रसारित झाले. [४] [५]
हे कथानक रामायणाच्या उत्तरा कांड या शेवटच्या अध्यायात उल्लेखिल्या गेलेल्या राम आणि सीता यांचे जुळे पुत्र लव आणि कुश यांच्या कथेवर आधारित आहे.
मुळात रामानंद सागरची योजना सीतेला वनवासातून परत आल्यावर रामायण संपवण्याची होती. परंतु वाल्मिकी समाज आणि पंतप्रधानांचे कार्यालय यांच्या मागणीनुसार सागर यांनी रामायणचा पाठपुरावा म्हणून लव कुश ही मालिका बनविली. [९]
रामायणानंतर कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान मालिकेच्या प्रसारणावेळी १६व्या आठवड्यात, इ.स. २०२०मध्ये रामायणाच्या तुलनेत प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि सकाळच्या वेळेत दोन कोटी आणि संध्याकाळी ४ कोटी ८६ लोकांनी दूरदर्शनचे कार्यक्रम पाहिले. [१०]