वायव्य आर्कान्सा राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: XNA, आप्रविको: KXNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: XNA) हा अमेरिकेतील आर्कान्सा राज्याच्या वायव्य भागात आहे.[१] हा विमानतळ फेटव्हिल पासून २८ किमी (१७ मैल) वायव्येस तर स्प्रिंगडेल पासून १९ किमी (१२ मैल) अंतरावर आहे.[२]
येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि युनायटेड एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.