हे पान मराठी विकिवर होत असलेल्या प्रताधिकार भंगाची तपासणी करण्यासाठी आणि तो नोंदवण्यासाठी आहे. अलिकडच्या बदलांवर लक्ष ठेऊन तसेही अनेक सजग सदस्य प्रताधिकार भंग रोखण्यास हातभार लावत असतातच. तरीही, काही सदस्यांनी त्यांच्या संपादन इतिहासात मोठ्या प्रमाणावर प्रताधिकार भंग केल्याचे लक्षात आल्यास व ते मान्य करण्यास प्रबळ पुरावे असतील तर आपण ह्या तपासणीची विनंती करू शकता. त्या विनंतीवर ह्या पानाचे उपपान म्हणून त्या विशिष्ट सदस्याच्या योगदानांची तपासणी प्रताधिकार भंगासाठी केली जाईल. या व्यतिरिक्त सापडलेल्या प्रत्येक प्रताधिकार भंगाची नोंद ते करणाऱ्या सदस्याच्या नावाने उपपान करून त्यामधे केली जाईल जेणेकरून त्या विशिष्ट सदस्याने केलेल्या प्रताधिकार भंगाची एका ठिकाणी यादी होत राहील.