यात एक किंवा अधिक विकिपीडिया सदस्यांचा सल्ला किंवा मते आहेत. हे पान विकिपीडियाच्या धोरण किंवा मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक नाही कारण ते समुदायाने मतदान किंवा इतर प्रक्रियेने मान्य केलेले नाही. निबंधामध्ये सर्वसामान्यपणे सर्वमान्य नियम अथवा काही सदस्यांना मान्य असलेले नियमच दर्शविले जातात.
या पानात असलेला मजकूर ठेवला आहे कारण तो विनोदी आहे. हा मजकूर गांभीर्याने घेऊ नका!!!
या पानाचा थोडक्यात अर्थ: मी मी आणि मीच!!! इतर काही असेल त्याला अवरूद्ध करून टाकीन!
ॲडमिनटायटीस हा आजार अनेक प्रचालकांमधे दिसून येतो आणि त्याचे खरे कारण अद्याप कळू शकलेले नसले तरीही अनेकदा तो दीर्घकाळ उत्पाताविरुद्ध केलेल्या कारवायांमुळे होऊ शकतो असे काही अभ्यासांमध्ये दिसून आलेले आहे. जरी हा आजार बहुतांशवेळा प्रचालकांनाच होत असला तरीही तो प्रचालक नसलेल्या अनेक व्यक्तींनाही होऊ शकतो हे अनेक उदाहरणांमधून समोर आलेले आहे.
इतरांचे मत घेणे किंवा सामान्यज्ञान वापरणे सोडून फक्त धोरण, धोरण आणि धोरण असे ओरडायला सुरूवात करतात.
जेव्हा सामान्यज्ञान आणि सर्व नियम तोडणे हेच खरे नियम आणि धोरणे विकिवर अस्तित्वात असताना फक्त सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणांचा उपयोग आणि तो ही उलट अर्थ लावून इतर सदस्यांची छळवणूक करण्यासाठी करायला वारंवार करतात.
अनेकदा हे धोरण मला लागू होत नाही! अशी त्यांची ओरड सुरू होऊ लागते.
ज्या प्रचालकांना हे पानही विनोदी वाटत नाही, त्यांना नक्कीच ह्या आजाराने पूर्णपणे ग्रासलेले आहे.
जी प्रचालकीय अवजारे, टूल्स, संहिता, सांगकामे आधी कधीच वापरली गेलेली नाहियेत आणि ज्या विशिष्ट कामांसाठी ती वापरलीही जात नाहीत असा मोठ्याप्रमाणावर अचानकच उपयोग ते करू लागतात.
ते प्रत्येक नव्या सदस्याला जुन्या सदस्यांची कळसुत्री खाते असल्याचे घोषीत करायला लागतात, त्यामुळे प्रत्येक नवीन सदस्याला ते अवरुद्ध करण्याच्या धमक्या देतात आणि अनेकांना अवरुद्ध करतात सुद्धा.
त्याला असे वाटू लागते की तोच एकमेव विकिच्या कल्याणासाठी या भूमीवर अवतरला आहे आणि इतर सर्व सदस्य हे विकि उध्वस्त करायला आलेले आहेत.
जेव्हा अनेकदा त्याच्या इतरांच्या चर्चापानावरील मजकूरामध्ये "तुम्ही सगळे मुर्ख आहात, हो हो अगदी तुम्ही सगळे, करा काय कारस्थान माझ्या विरुद्ध करायचे ते — मीच शेवटी तुम्हांला सत्य काय आहे ते दाखवीन!!" अशी अनेक वाक्ये यायला लागतात.
जेव्हा इतर सदस्य त्याच्याशी सद्भावना गृहित धरुन काहीही बोलायला जातात तेव्हा त्याला वाटते ते सर्वजण त्याच्यावर हल्ला करायलाच आलेले आहेत.
त्याच्या बद्दल केलेली प्रत्येक मत आणि टिका तो वैयक्तिक शेरेबाजी किंवा कधी-कधी तर शिवीगाळ म्हणून काढून टाकतो. आणि अवरुद्ध करायची धमकी/ताकीद देतो.
सगळे नविन सदस्य त्याला चविष्ट वाटू लागतात त्यामुळे तो प्रत्येक नविन सदस्यांना चावायला लागतो.
या आजाराच्या शेवटच्या काळात तो फक्त आणि फक्त प्रत्येक सदस्याला अवरुद्ध करणे आणि पाने, त्याचा इतिहास, चर्चापाने, पूर्णपणे काढून टाकणे एवढेच काम करू लागतो.
ह्या आजारावरील उपचार प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात,सध्या २०२५, कोणत्याही एका उपचार पद्धतीवर एकमताने धोरण ठरलेले नाही, खालील काही पद्धती वापरल्या जाऊ शकतात :
त्या रोगी प्रचालकानी काही लेख लिहावेत, हो स्वत: स्वत:च्या बोटांनी टंकन करुन नवीन लेख लिहावेत, म्हणजे ते पांढऱ्या स्क्रिनवर काळी अक्षरे लिहितात ती लिहावीत. (म्हणजे विकिपीडियावर प्रत्येकानी अशीच सुरूवात केलेली असते त्याची आठवण जर असेल तर!!!)
विकिसुट्टी घ्यावी, (किती काळाची घ्यावी हे रोगाच्या गांभिर्यावर अवलंबून आहे. पण निदान एक दोन वर्षांची तरी घ्यावीच.)
इतरांचे मत घ्यावे, (अर्थातच विकिवर काहीही नविन करताना ते आवश्यक असते हे विसरून गेले नसाल तर.)
अशा आजारातून बरे झालेल्यांचे मत घ्यावे. (सध्यातरी असे कोणी बरे झालेले प्रचालक अस्तित्वात नाहीत.)
स्वत:च प्रचालक पदाचा राजीनामा द्यावा.
तुम्ही जिथे प्रचालक नाही अश्या विकिवर संपादने करायला लागा.