ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.
यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.
इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.