विजय पाटकर | |
---|---|
जन्म |
विजय पाटकर २९ मे, इ.स. १९६१[१] मुंबई |
राष्ट्रीयत्व | मराठी, भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९८८ पासून |
भाषा | मराठी |
प्रमुख नाटके | दहा बाय दहा |
प्रमुख चित्रपट |
नवरा माझा नवसाचा (मराठी) सिभ्भा (हिंदी) सिंघम (हिंदी) टोटल धमाल (हिंदी) हमाल दे धमाल (मराठी) |
पत्नी | सरोज पाटकर |
अपत्ये | शार्दूल पाटकर |
vijaypatkar29 |
विजय पाटकर (२९ मे, इ.स. १९६१[१] - हयात) हे मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहेत. ह्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत.
१९७९ पासून आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आंतरबँकनाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरुवात केली. १९८३ पासून त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, बोलबोल म्हणता, टूरटूर, मुंबई मुंबई,घर घर इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली, १९८५ पासून आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तुझ्यावाचून करमेना, नवरा माझा नवसाचा, झक मारली बायको केली पासून अगदी अलीकडच्या गंमत, वन टू थ्री फोर, अर्धनारी नटेश्वर, आय पी एल अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या, त्याचप्रमाणे रिवायत, रिमांड होम, तेजाब, नरसिम्हा, क्या कूल है हम, ऑल द बेस्ट, गोलमाल ३ अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक उनाड दिवस, चष्मे बहादूर, जावईबापू झिंदाबाद, सासू एक नंबरी जावई दस नंबरी, सगळं करून भागले अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. सध्या लाइफ इन दी डार्क या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |