विराट पर्व

विराट पर्व हे पांडवांचे अज्ञातवासाचे शेवटचे वर्ष होय. या पर्वात एकूण चार उप-पर्व आहेत. ते पुढीलप्रमाणे:

क्र. उप-पर्व संदर्भ
पांडव-प्रवेश पर्व पांडवांचा विराट नगरात प्रवेश
समयपालन पर्व पांडवांचे वेशांतरण करून अज्ञातवासाची सुरुवात
कीचक वध पर्व भीमाने केलेला कीचकाचा वध
गो- हरण पर्व कौरवांनी केलेले विराट नगरातील गायींचे हरण आणि पांडवांची अज्ञातवास समाप्ती

पांडवांचे वेषांतरण

[संपादन]

पांडवांनी विराट नगरात प्रवेश केल्यावर प्रत्येकाने राजदरबारात विविध कामे हाती घेतली. अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा या स्त्रीमध्ये रूपांतर झाले होते. अर्जुनाने त्याला मिळालेल्या या वेशामुळे राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी पटराणी सुदेष्णा हिची दासी होती. नकुल हा अश्वपाल तर सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव या नावाने भोजनगृहात काम करत होता.