विहार तलाव हा मिठी नदीवरील उत्तर मुंबईत विहार गावाजवळ बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे, ज्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे देखील म्हणतात. याचे बांधकाम इस १८५६ मध्ये सुरू झाले आणि इस १८६० मध्ये पूर्ण झाले. हा तलाव मुंबईच्या बेटांच्या सॅलसेट गटातील असून मुंबईतील सर्वात मोठा तलाव असल्याचे मानला जातो. याचे नकाशातील स्थान तुळशी तलाव आणि पवई तलाव दरम्यान आहे. हा तलाव मुंबई विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोत्रापैकी एक आहे. भांडुप येथे जलशुद्धीकरण केल्या नंतर ते मुंबई शहराच्या फक्त ३% पाण्याची गरज पुरवते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |