प्रकार | संयुक्त उपक्रम |
---|---|
उद्योग क्षेत्र | |
स्थापना | 1 जून 2021 |
मुख्यालय | यूके |
सेवांतर्गत प्रदेश | युनायटेड किंग्डम |
महत्त्वाच्या व्यक्ती | Lutz Schüler (मुख्य कार्यकारी अधिकारी) |
मालक |
|
पोटकंपनी |
|
संकेतस्थळ |
www |
व्हर्जिन मीडिया ओ२ (कायदेशीरपणे व्हीएमइडी ओ२ युके लिमिटेड) ही लंडनमधील ब्रिटिश मास मीडिया आणि दूरसंचार कंपनी आहे. या कंपनीची स्थापना जून २०२१ मध्ये लिबर्टी ग्लोबल आणि टेलिफॉनिका या दोघांमधील ५० टक्के भागीदारीमध्ये संयुक्त उपक्रम म्हणून ही नवीन कंपनी स्थापित झाली. या कंपनीसाठी व्हर्जिन मीडिया आणि ओ२ युके व्यवसायांचे विलीनीकरण करण्यात आले.[१][२][३]
हे युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठ्या मनोरंजन आणि दूरसंचार चालकांपैकी एक आहे. या कंपनीचे इ.स २०२१ मध्ये सुमारे ४.७ करोड ग्राहक आहेत.[१][४]
जानेवारी २०२२ पर्यंत, व्हर्जिन मीडिया आणि ओ२ युके कडे स्वतंत्र ग्राहक संकेतस्थळ आणि ब्रँडिंग आहे. तसेच दोन स्वतंत्र मोबाइल सेवा (व्हर्जिन मोबाइल आणि ओ२ मोबाइल) चालवतात. त्यांनी त्यांचा संयुक्त उपक्रम 'व्होल्ट' सादर केला आहे. जेथे ग्राहकांना व्हर्जिन मीडिया ब्रॉडबँडसह ओ२ पे मासिक योजना दोन्ही घेतल्याबद्दल पुरस्कृत केले जाते.[५]