शिलाँग चेंबर कॉयर

शिलाँग चेंबर कॉयर हा शिलाँग स्थित गायनसमूह आहे. त्याची स्थापना २००१ साली शिलाँग येथे करण्यात आली. इंडिया हॅज गॉट टॅलेंट या कलर्स टी.व्ही. दूरचित्र वाहिनीवरील कार्यक्रमाच्या ऑक्टोबर २०१०मधील दुसऱ्या मोसमात हा वाद्यवृंद प्रकाशझोतात आला होता. चीन मधील शांघाय येथे जुलै २०१० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या जागतिक कॉयर गेम्स मध्ये या कॉयरने सहभाग घेतला होता. त्यात त्यांना तीनही प्रकारात - म्युझिका सॅक्रा, गॉस्पेल आणि लोकप्रिय यात सुवर्ण पदक मिळाले.

इतिहास

[संपादन]

या कॉयरने आपले पहिले कार्यक्रम भारतातील रॉक संगीताची पंढरी मानल्या जाणाऱ्या [[शिलाँग][ संदर्भ हवा ]] मधील पाइनवूड हॉटेल येथे १४ आणि १५ जानेवारी २००१ रोजी केले. याचे संगीत संचालन कॉयरचे संस्थापक नील नोंग्कीनरीन्ह यांनी केले, तसेच त्यांनी पियानो वादक म्हणूनही काम केले. आज या कॉयरचे २५ सदस्य आहेत, त्यात १५ गायक गायिकांचा समावेश आहे. इतर कलाकार वादक आहेत.पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि त्या बरोबरच खासी भाषेतील किंवा हिंदी चित्रपट गीते यांचा मिलाफ असलेली गाणी सादर करणे, हे या कॉयरचे वैशिष्ट्य आहे.

सादरीकरणे आणि कार्यक्रम

[संपादन]

राज्य निवडणूक आयोगासाठी त्यांनी तयार केलेला व्हिडीओ 'जस्ट वन' सुद्धा बराच गाजला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीच्या वेळी या वाद्यवृंदाला राष्ट्रपती भवनात कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. 'कौन बनेगा करोडपती' या अमिताभ बच्चन यांच्या दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाच्या सहाव्या सिझनच्या सुरुवातीला सुद्धा या कॉयरने गाणी सादर केली. शंकर एहसान लॉय, उषा उथ्थप, झाकीर हुसेन अशा नामवंत कलाकारांबरोबर सुद्धा या कॉयरने काम केले आहे. यांनी भारतात अनेक ठिकाणी तसेच इंग्लंड, कॅनडा, उत्तर अमेरिका,आग्नेय आशियामध्ये दौरे करून कार्यक्रम सादर केले.व्हिएन्ना चेंबर ऑर्केस्ट्राबरोबर सुद्धा त्यांनी कार्यक्रम केला.


पुरस्कार

[संपादन]

[]

  1. ^ अधिकृत संकेतस्थळ शिलाँग चेंबर कॉयर