शिलेंद्र कुमार सिंह उर्फ एसके सिंग (२४ जानेवारी, इ.स. १९३२ - १ डिसेंबर, इ.स. २००९) हे एक भारतीय मुत्सद्दी होते. डिसेंबर २००४ ते सप्टेंबर २००७ पर्यंत ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होते. तसेच सप्टेंबर २००७ ते डिसेंबर २००९ दरम्यान त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
सिंग हे १९८९ ते १९९० पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव होते. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होण्यापूर्वी ते दिल्लीतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या प्रगत अभ्यास संस्थेचे महासचिव होते. १९ ऑगस्ट २००७ रोजी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.[१] ४ सप्टेंबर २००७ रोजी त्यांनी अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून पद सोडले.[२] आणि ६ सप्टेंबर रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.[३]