शिव ठाकरे | |
---|---|
जन्म |
९ सप्टेंबर, १९८९ अमरावती, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | बिग बॉस मराठी २ |
शिव ठाकरे (९ सप्टेंबर १९८९; अमरावती, महाराष्ट्र) एक भारतीय नृत्यदिग्दर्शक, एमटीव्ही रोडीज स्पर्धक आणि बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे.[१][२] रोडीज राइजिंग शोमध्ये तो सेमी फायनल पर्यंत पोहोचला. २०१९ मध्ये तो एमटीव्ही शो अँटी सोशल नेटवर्क वर दिसला होता.[३][४][५]
शिव ठाकरे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने वृत्तपत्रातील डिलिव्हरी बॉय, ट्यूशन क्लास आणि शेती अशा अनेक अर्धवेळ नोकऱ्या केल्या होत्या. शिवला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि त्याने स्वतःहून नृत्य शिकले.[६][७]
शिवने आपले शिक्षण महाराष्ट्रातील अमरावती येथील संत कवाराम विद्यालयातून केले. त्यांनी नागपुरातील जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकी केली.
वर्षे | रिॲलिटी शो | कमेंट्स | नोट्स |
---|---|---|---|
२०१७ | एम.टी.व्ही. रोडीज | स्पर्धक | सेमी-फायनलिस्ट |
२०१८ | अँटी सोशल नेटवर्क | विजेता | |
२०१९ | बिग बॉस मराठी २ | विजेता |
शिव ठाकरे यांनी आपल्या कारकीर्दची सुरुवात नृत्यापासून केली. तो एक नृत्यदिग्दर्शक आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तपत्र देणे, नृत्य वर्ग घेणे आणि शेती करणे अशा अनेक नोकरींमध्ये काम केले. सन २०१७ मध्ये त्यांनी रोडीज नावाच्या एमटीव्हीवरील रिऍलिटी शोसाठी ऑडिशन दिले. त्यांची जीवनयात्रा आणि कार्यक्रमात भाग घेण्याची तयारी पाहून रणविजय सिंह प्रभावित झाले. नंतर त्याची शोसाठी निवड झाली होती आणि तो रणविजयच्या टोळीत होता. तो रोडीजमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहोचला. तो अँटी सोशल नेटवर्क नावाच्या आणखी एका एमटीव्ही शोमध्ये दिसला जिथे त्याने लोकांचे मनोरंजन केले. २०१९ मध्ये तो मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रम बिग बॉस मराठी २ पर्वामध्ये दिसला. त्याच्या कामगिरीमुळे आणि त्यांच्या चाहत्यांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे त्याने त्याचा विजेते होण्याचा मान पटकावला.[८][९][१०]