शीव टेकडी किल्ला महाराष्ट्राच्या मुंबई शहरातील एक किल्ला आहे. हा किल्ला भारतातीत ब्रिटिश सरकारने बांधला होता. याची रचना १६६९ ते १६७७ दरम्यान झाली. त्यावेळी हा किल्ला ब्रिटिश अधिपत्याखालील परळ बेट आणि पोर्तुगीज अंमलाखालील साष्टी बेटांच्या सीमेवर होता.[१] येथून जवळ असलेले शिवडीचा किल्ला आणि रिवा किल्ला हे एकमेकांना संरक्षण पुरवीत.
१९२५ मध्ये हा किल्ला पहिल्या प्रतीची वारसा इमारत असल्याचे जाहीर केले गेले.[२] टेकडीवर असलेला हा किल्ल्या भग्नावस्थेत आहे. किल्ल्याच्या भिंती पडलेल्या अवस्थेत असून त्यांवर वृक्षवेली उगवलेल्या आहेत. येथे येणाऱ्या लोकांनी भिंतींवर लिहून ठेवणे, चित्रे काढणे, दगड उचलून फेकणे, असे अनेक प्रकारचे उत्पात केलेल आढळतात. २००९ मध्ये या किल्ल्याचे पुनरुत्थान सुरू झाले होते परंतु पैशाच्या अभावी हे बंद पडले.[१] या टेकडीच्या पायथ्याशी भारतीय पुरातत्त्व खात्याचे कार्यालय आहे.[३]
हा किल्ला शीव रेल्वे स्टेशनापासून ५०० मीटर अंतरावर आहे[४] आणि जवळच एक उद्यानही आहे.