शैलेंद्र

शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र (३० ऑगस्ट १९२३, रावळपिंडी, पाकिस्तान - १४ डिसेंबर १९६६) हे एक भारतीय हिंदी कवी आणि चित्रपटांचे गीतकार होते.

शैलेंद्र यांचे वडील लष्करात होते. वडील रिटायर झाल्यावर त्यांचे कुटुंब मथुरेला स्थायिक झाले.. तेथे शैलेंद्रांचे शिक्षण झाले. त्यांच्या घरी उर्दू आणि फारसी बोलल्याऐ जात. शाळेत असताना त्यांना राष्ट्रीय विचारांची प्रेरणा मिळाली. १९४२ साली अभियांत्रिकी शिकण्यासाठी ते मुंबईला आले व त्यानंतर रेल्वेत नोकरी केली. त्यांना ऑगस्ट १९४२ च्या चळवळीत तुरुंगवास झाला. ऑगस्ट १९४७ मध्ये मुंबईत झालेल्या कविसंमेलनात शैलेंद्रांनी आपल्या कविता सादर केल्या. तेथे असलेल्या राज कपूर यांनी त्या ऐकून आग चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास आमंत्रण दिले, परंतु ते झाले नाही. १९४८ साली शैलेंद्रांचे लग्न झाल्यावर त्यांनी राज कपूरकडून बरसातची गाणी लिहिण्याची संधी मिळाली. यानंतर शैलेंद्र यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.

पुरस्कार

[संपादन]

शैलेंद्र ह्यांना तीन वेळा फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार मिळाला.

  • १९५९ - यहुदी मधील ये मेरा दीवानापन या गीतासाठी
  • १९६० - [[[अनाडी (१९५९ चित्रपट)|अनाडी]] मधील सब कुछ सीखा या गीतासाठी
  • १९६९ - ब्रह्मचारी मधील मैं गाऊं या गीतासाठी.