Shriram Group (en); श्रीराम समूह (mr); श्रीराम समूह (hi); ஸ்ரீராம் குழுமம் (ta) Indian conglomerate (en); Indian conglomerate (en); இந்திய வணிக சேவை நிறுவனம் (ta)
श्रीराम ग्रुप हा चेन्नई येथे मुख्यालय असलेले एक भारतीय समूह आहे. त्याची स्थापना ५ एप्रिल १९७४ रोजी आर. त्यागराजन, [१] एव्हीएस राजा आणि टी. जयरामन यांनी केली होती.[२][३][४] समूहाची सुरुवात चिट फंड व्यवसायात झाली आणि नंतर कर्ज आणि विमा व्यवसायात त्यांनी प्रवेश केला.
श्रीराम फायनान्स ही समूहाची प्रमुख कंपनी आहे जी मोठे उद्योगीक कर्ज आणि किरकोळ कर्ज (वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज आणि दुचाकी कर्ज) यासारख्या वित्तीय सेवा पुरवते.[५] २०२२ मध्ये श्रीराम सिटी युनियन फायनान्स [६][७] आणि श्रीराम कॅपिटलचे श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समध्ये विलीनीकरण झाले.[८][९]
श्रीराम हाऊसिंग फायनान्स ही श्रीराम फायनान्सची उपकंपनी आहे आणि मुख्यत्वे गृहकर्ज सेवा प्रदान करते.[१०]
श्रीराम लाइफ इन्शुरन्स ही समूहाची जीवन विमा शाखा आहे आणि श्रीराम समूह आणि दक्षिण आफ्रिकी कंपनी सॅनलम यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.[११]
श्रीराम जनरल इन्शुरन्स हे व्यावसायिक आणि किरकोळ वाहन विमा, गृह विमा आणि प्रवास विमा यामध्ये गुंतलेली आहे. श्रीराम ग्रुप आणि सॅनलम यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.[१२]
श्रीराम फायनान्शियल व्हेंचर्स ही श्रीराम ग्रुपच्या वित्तीय सेवा आणि विमा व्यवसायांची होल्डिंग कंपनी आणि प्रवर्तक आहे. हे श्रीराम ओनरशिप ट्रस्ट (SOT) आणि सॅनलम ग्रुप यांच्या संयुक्त मालकीचे आहे.[१३]
श्रीराम प्रॉपर्टीज हा रिअल इस्टेट डेव्हलपर आहे जो प्रामुख्याने दक्षिण भारतात मध्यम-उत्पन्न गृह प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करतो. [१४]
श्रीराम फॉर्च्युन ही समूहाची आर्थिक सेवा वितरण शाखा आहे. [१५]
श्रीराम एएमसी ही म्युच्युअल फंडांवर लक्ष केंद्रित करणारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे.[१६]
श्रीराम इनसाइट (रिटेल स्टॉक ब्रोकर)[१५], श्रीराम वेल्थ (संपत्ती व्यवस्थापन सल्लागार)[१५] आणि श्रीराम ऑटोमॉल (वाहन लिलाव) या कामांमधल्या उपकंपन्या आहेत.[१७]