संध्या किंवा संध्यावंदना हा हिंदू धर्मातील ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रिवर्णीयांनी करावयाची एक उपासना आहे.दिवस व रात्र यांच्या संधीकाळात केली जाणारी उपासना म्हणून याला संध्या म्हणतात. या उपासनेची सुरुवात उपनयनानंतर केली जाते. प्रतिदिन प्रातःकाळ, माध्यानकाळ व सायंकाळ अशा तिन्ही काळी ही उपासना केली जाते. ही उपासना आपल्या गुरूकडून शिकून घ्यावी लागते. अर्घ्यदान, गायत्री जप व उपस्थान ही संध्येतील मुख्य कर्मे आहेत. संध्येमध्ये गायत्री देवी, सूर्य, अग्नी, वरुण इ. देवांची उपासना केली जाते.