या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
सकाळ | |
---|---|
प्रकार | दैनिक |
आकारमान | ७४९ बाय ५९७ सेंटिमीटर |
मालक | प्रतापराव पवार |
प्रकाशक | सकाळ वृत्तसमूह |
मुख्य संपादक | श्रीराम पवार |
स्थापना | जानेवारी १, १९३२ |
भाषा | मराठी |
किंमत | ५ रुपये व काही दिवस ६ रुपये |
मुख्यालय | पुणे, महाराष्ट्र, भारत |
खप | १३ लाख |
भगिनी वृत्तपत्रे | महाराष्ट्र हेराल्ड गोमंतक टाइम्स ॲग्रोवन |
| |
संकेतस्थळ: ईसकाळ.कॉम |
सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.
सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.
सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने :
दैनिके:
नियतकालिके:
दूरचित्रवाणी :
न्यूझ पोर्टल :
'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या :
'सकाळचे संपादक
सकाळ टुडे स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले.