सत्यानंद सरस्वती (२६ जुलै १९२३ - ५ डिसेंबर २००९) हे भारतात आणि भारताबाहेर अध्यात्माचा प्रसार करणारे संन्यासी, योगशिक्षक आणि गुरू होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांनी बिहार स्कूल ऑफ योगा स्थापन केले. त्यांनी ऐंशीहून अधिक पुस्तकांचे लेखन केले. आसन प्राणायाम मुद्रा बंध हे त्यांचे पुस्तक, योगावर आज उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक मानले जाते.
झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्याच्या रिखिया गावात सत्यानंद सरस्वतींचा योगाश्रम आहे. या शिवाय, मुंगेर येथील ’बिहार योग विद्यालया’ची स्थापना सत्यानंदांनी केली आहे..