सारस्वत ब्राह्मण हा हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर राहत होते. सारस्वत ब्राह्मण हे विंध्य पर्वताच्या उत्तरेस राहणाऱ्या पंच गौड ब्राह्मणांपैंकी एक आहेत.[१].
सारस्वत ब्राह्मण हे भारतीय उपखंडातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरले होते. एक गट किनारपट्टी सिंध आणि गुजरातमध्ये वास्तव्य करीत होता. इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर हा गट मुंबई राज्यात स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी पंजाब व काश्मीरमध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर पाकिस्तानातून पलायन केले. गौड सारस्वत नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टीवर) आढळतो.[२][३][४]