सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा | |
---|---|
![]() | |
पक्षाध्यक्ष | प्रेम सिंह तमांग |
स्थापना | ४ फेब्रुवारी २०१३ |
मुख्यालय | गंगटोक, सिक्कीम |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
लोकसभेमधील जागा | १ / ५४५
|
राज्यसभेमधील जागा | ० / २४५
|
विधानसभेमधील जागा | १९ / ३२ (सिक्कीम)
|
राजकीय तत्त्वे | लोकशाही समाजवाद |
संकेतस्थळ | [myskm.org] |
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा भारत देशाच्या सिक्कीम राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २०१३ साली सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट ह्या पक्षामधून बाहेर पडून प्रेम सिंह तमांग ह्यांनी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत १० जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर २०१९ विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने १७ जागांवर विजय मिळवला. पक्षाचे अध्यक्ष प्रम सिंह तमांग सिक्कीमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील सिक्कीम लोकसभा मतदारसंघामधून सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा उमेदवार निवडून आला. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.