सुनीता पुरुषोत्तम देशपांडे

सुनीता देशपांडे
जन्म नाव सुनीता पुरुषोत्तम देशपांडे
जन्म जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६
रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर ७, इ.स. २००९
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारत
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती आहे मनोहर तरी
वडील सदानंद महादेव ठाकूर
आई सरला सदानंद ठाकूर
पती पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
अपत्ये मानसपुत्र दिनेश ठाकूर

सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्‍नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

पुरस्कार

[संपादन]

सुनीता देशपांडे यांना जी.ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ’प्रिय जीए पुरस्कार’ इ.स. २००८मध्ये मिळाला होता.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
आहे मनोहर तरी आत्मचरित्र मौज प्रकाशन १९९०
प्रिय जी.ए. पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृह २००३
मण्यांची माळ ललित मौज प्रकाशन २००२
मनातलं अवकाश मौज प्रकाशन
समांतर जीवन अनुवादित लेख सन पब्लिकेशन १९९२
सोयरे सकळ व्यक्तिचित्रण मौज प्रकाशन १९९८