सुरतकल

सुरतकल
ಸುರತ್ಕಲ್
भारतामधील शहर

येथील राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कर्नाटक
सुरतकल is located in कर्नाटक
सुरतकल
सुरतकल
सुरतकलचे कर्नाटकमधील स्थान

गुणक: 12°59′24″N 74°48′30″E / 12.99000°N 74.80833°E / 12.99000; 74.80833

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
जिल्हा दक्षिण कन्नड जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ७९ फूट (२४ मी)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


सुरतकल हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एक नगर व मंगळूर शहराचे उपनगर आहे. सुरतकल अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या उत्तरेस स्थित असून ते मंगळूर महापालिकेच्या अखत्यारीत येते. भारतामधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानाचा कर्नाटक राज्यामधील कॅम्पस सुरतकल येथे स्थित आहे. येथील राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कर्नाटक तंत्रज्ञान व अभियांत्रिकीसाठी सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.

सुरतकल राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे. मंगळूर विमानतळ येथून १५ किमी अंतरावर आहे.