सुहास विठ्ठल मापुस्कर (२२ जानेवारी, इ.स. १९३५:मुंबई, महाराष्ट्र, भारत[१] - २१ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी डॉक्टर आणि समाजसेवक होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील वाकड गाव आहे. त्यांचा जन्म मुंबईत झाला. तेथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात एम.बी.बी.एस.ही पदवी घेतली.