५५० किलो वजनाचा हा उपग्रह, कार्टोसॅट- २ यासह चार उपग्रह एकत्रितपणे पीएसएलव्ही या उपग्रहवाहकाने १० जानेवारीला अवकाशात नेले होते.
एसआरई कुपीच्या साह्याने अवकाशातच गुरुत्वाकर्षणासंबंधी दोन प्रयोग करण्यात आले.
परत येताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर होणारे घर्षण यशस्वीपणे सहन केल्यानंतर पॅराशूट सिस्टिमने कुपीचा वेग कमी करण्यात आला व त्याद्वारे एसआरई कुपी पृथ्वीवर कसलेही नुकसान न होता परत आली.