हातिम | |
---|---|
दूरचित्रवाहिनी | स्टार प्लस |
भाषा | हिंदी |
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका |
देश | भारत |
निर्माता | ज्योती सागर |
दिग्दर्शक | * अमृत सागर
|
निर्मिती संस्था | सागर फिल्म्स |
लेखक | दिपाली झुंझप्पा |
प्रसारण माहिती | |
चित्रप्रकार | SDTV |
पहिला भाग | 26 December 2003 |
अंतिम भाग | 12 November 2004 |
एकूण भाग | ४७ |
वर्ष संख्या | १ |
हातिम ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे, जी २६ डिसेंबर २००३ ते १२ नोव्हेंबर २००४ पर्यंत स्टार प्लसवर प्रसारित झाली होती. या मालिकेत कल्पनारम्य, नाटक आणि इतर अनेक शैलींचे घटक असून याचे दिग्दर्शन मालिका अमृत सागर यांनी केले होते. पूर्व इस्लामिक काळातील अरेबियन राजकुमार आणि कवी असलेल्या हातिम अल-ताईच्या मूळ कथेवर आधारित ही मालिका आहे.[१]
ही मालिका स्टार प्लस, डिझ्नी चॅनल इंडिया, स्टार उत्सव आणि हंगामा टीव्ही यांसारख्या विविध भारतीय चॅनेलवर दाखवली गेली आहे. मावीरन हातिम या नावाने स्टार विजय वाहिनीसाठी ही मालिका तमिळ भाषेतही प्रसारित करण्यात आली.[२]
मध्ययुगात, यमनच्या सम्राटाचा नवजात मुलगा हातिम हा शांतता आणि चांगुलपणाचा संदेश पसरवेल, अशी भविष्यवाणी होते. त्याच वेळी जाफर राज्याच्या सम्राटाचा मुलगा जन्माला येतो आणि राजवाड्यातील नजुमी या बाळाला दुष्ट आत्म्यांचा सेवक बनवण्यासाठी काळी जादू करतो.
आपल्या नवजात मुलाला मारले तर जगासाठी चांगले होईल असा निर्णय जाफरचा बादशहा घेतो आणि बाळाचे हृदय जाळण्याचा आदेश देतो. परंतु नजुमी त्याऐवजी एका सशाचे हृदय जाळतो व सम्राटाला दाखवतो, ज्यामुळे सम्राटाला विश्वास बसतो की त्याच्या आदेशाचे पालन झाले आहे. नजुमी मुलाला घेतो आणि त्याचे नाव दज्जाल असे ठेवतो. नंतर तो त्याला काळी जादू शिकवतो.
यानंतर वीस वर्षे निघून जातात. यमनमध्ये, हातिम एक दयाळू आणि सगळ्यांचा आवडता राजकुमार बनतो. तर तिकडे जाफरमध्ये दज्जाल त्याच्या पालकांची हत्या करून सम्राट बनतो. दज्जाल राजवाड्याच्या मनोऱ्याच्या शीर्षस्थानी एक चिरंतन आग बनवतो, ज्यातून त्याला काळी शक्ती मिळते. नजुमी दज्जालला सांगतो की, जर दज्जालने चांगुलपणाच्या शक्तींवर कब्जा केला तर तो जगाचा सर्वोच्च शक्तिशाली होईल. त्यासाठी त्याला दुर्गापूरची राजकन्या सुनैना हिच्याशी लग्न करावे लागेल, जी चांगुलपणाची मूर्ती होती.
सुनैनाचा हात लग्नासाठी मागण्यास दज्जाल दुर्गापूरला येतो, पण ती नकार देते. जेव्हा दज्जाल सुनैनाचा किशोरवयीन भाऊ सूरजला धमकावतो तेव्हा सूरज आपल्या तलवारीने दज्जलचा हात कापतो. परंतु काळ्या जादूने दज्जालचा हात लगेच बरा होतो. त्यानंतर दज्जाल सूरजला दगडाच्या पुतळ्यात रूपांतरित करतो. दज्जाल सुनैनाला सांगतो की, जर तिने लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला तरच तो सूरजला परत मनुष्य बनवेल. तो सुनैनाला प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सात महिने देतो. त्यानंतर त्याचा शाप कायमचा होईल आणि सूरज कधीच जिवंत होणार नाही.
तिकडे येमेनमध्ये हातिमचा विवाह परिस्तानची राजकुमारी जास्मिनशी निश्चित होतो. हातिम आणि जास्मिन पहिल्यांदा भेटतात आणि प्रेमात पडतात. सुनेनाचा प्रियकर आणि जनकपूरचा राजकुमार विशाल हा भिकाऱ्याच्या वेशात हातिमकडे येतो. विशाल हातिमला दज्जालशी लढायला त्याची मदत करण्याची विनंती करतो. येमेनचा सम्राट, हातीम, परिस्तानचा सम्राट आणि विशाल यांची भेट होते. परिस्तानचा सम्राट सांगतो की, जेव्हा चांगुलपणाच्या शक्तींनी परिस्तानची निर्मिती केली तेव्हा एक भविष्यवाणी झाली होती की, एक काळी जादू या जगावर राज्य करेल.परंतु जर चांगल्या देवदूताने हस्तक्षेप केला तर असे टाळता येण्यासारखे होते.
हातिमला दूरच्या प्रदेशात जावे लागणार होते आणि दज्जालची काळी शक्ती नष्ट करण्यासाठी सात प्रश्न सोडवावे लागतील. सम्राट हातिमला ज्वेस्ट्रॉन्गिल नावाची जादुई तलवार देतो. जास्मिन हातिमला होबो नावाच्या एल्फला अंगरक्षक म्हणून हातिमसोबत पाठवते. होबो तिचा बालपणीचा मित्र आणि परिस्तानचा सेवक असतो. हातीम प्रश्नांची उत्तरे शोधत असताना, दज्जालची काळी शक्ती आणि जादुई मनोरे हळूहळू नष्ट होतात. तथापि हातिमने सहाव्या प्रश्नाचे उत्तर शोधल्यानंतर सातवा प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ उरत नाही.
यमन, परिस्तान, दुर्गापूर आणि जनकपूरचे सैन्य अंतिम लढाईसाठी जाफर राज्यात येते. त्यांची सेना दज्जालच्या झोम्बी सैन्याविरुद्ध लढत असताना हातीम किल्ल्यामध्ये प्रवेश करतो आणि दज्जालशी लढतो. ते दोघे एकाच वेळी मरतात, पण हातिम सातव्या प्रश्नाचे उत्तर मिळवून मृत्यूला हरवतो.
ही मालिका स्टार प्लस, डिझ्नी चॅनल इंडिया, स्टार उत्सव आणि हंगामा टीव्ही यांसारख्या विविध भारतीय वाहिन्यांवर सिंडिकेट केली गेली आहे. [४] मावीरन हातिम नावाच्या स्टार विजय वाहिनीसाठी ही मालिका तमिळ भाषेतही डब करण्यात आली आहे. [५]