हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा १८५६ किंवा १८५६चा पंधरावा कायदा हा ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश भारतात अमलात आणलेला कायदा होता. या कायदाद्वारे हिंदू विधवांनी केलेले पुनर्विवाह कायदेशीर ठरले. याचा मसुदा लॉर्ड डलहौसीच्या सत्ताकालात लिहिण्यात आला आणि लॉर्ड कॅनिंगने हा अमलात आणला. हा कायदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाआधी २७ जुलै, १८५६ रोजी अमलात आला.[१]
ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या कायद्यासाठी सरकारकडे दरखास्त केली होती.[२] याच्याविरुद्ध धर्मसभेने राधाकांत देबद्वारा चौपट सह्या असलेली दरखास्त सरकारकडे केली. लॉर्ड डलहौसीने धर्मसभेच्या दरखास्तीला बरखास्त केले व स्वतः या कायद्याचा मसुदा पूर्ण केला. त्याकाळी हा कायदा हिंदू प्रथांचे सरसकट उल्लंघन करणारा मह्णून पाहिले गेले होते.[३][४]
विल्यम बेंटिंकने १८२९मध्ये अमलात आणलेल्या सती प्रतिबंधक कायद्यानंतरचा हा पहिला समाजसुधारक कायदा होता.[५][६][७][८][९][१०]
<ref>
चुकीचा कोड; carroll-2008-p78
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही