१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (६० षटके)
स्पर्धा प्रकार द्वि गट फेरी आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३ वेळा)
सहभाग
सामने २२
सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलिया लिंडसे रीलर (४४८)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया लीन फुल्स्टन (१६)
१९८२ (आधी) (नंतर) १९९३

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक (प्रायोजक नावानुसार १९८८ शेल द्विशतसांवत्सरिक महिला क्रिकेट विश्वचषक) ही एक क्रिकेट स्पर्धा २९ नोव्हेंबर - १८ डिसेंबर १९८८ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये झाली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघटनेद्वारे आयोजित गेली होती. महिला विश्वचषकातली ही चौथी विश्वचषक स्पर्धा होती. या आधीची स्पर्धा सहा वर्षांपूर्वी १९८२ साली न्यू झीलंडमध्ये झाली होती. माजी विजेते ऑस्ट्रेलिया होते. सर्व सामने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या प्रकारामध्ये खेळवले गेले. ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळेस स्पर्धा दुहेरी साखळी पद्धतीने खेळविली गेली. यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड, न्यू झीलंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स या पाच देशांनी भाग घेतला. आयर्लंड आणि नेदरलँड्सने विश्वचषक पदार्पण केले. तर वेळेवर भांडवल गोळा होऊ न शकल्याने भारत आणि वेस्ट इंडीजला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला आणि सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तर ३ऱ्या स्थानाकरता झालेल्या सामन्यात न्यू झीलंडने आयर्लंडवर ७० धावांनी विजय नोंदवत तिसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाच्या लिंडसे रीलर हिने सर्वाधिक (४४८) धावा केल्या तर लीन फुल्स्टन हिने सर्वाधिक १६ बळी घेतले.

सहभागी देश

[संपादन]
देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यजमान, महिला संपूर्ण सदस्य १९८२ विजेते (१९७८, १९८२)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड महिला संपूर्ण सदस्य १९८२ विजेते (१९७३)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९८२ गट फेरी (१९७३, १९७८, १९८२)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड निमंत्रित पदार्पण पदार्पण
Flag of the Netherlands नेदरलँड्स पदार्पण पदार्पण

मैदाने

[संपादन]
मैदान शहर सामने संख्या
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१ पर्थ
विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.२ पर्थ
नॉर्थ सिडनी ओव्हल सिडनी
नॉर्थ सिडनी ओव्हल क्र.२ सिडनी
मानुका ओव्हल कॅनबेरा
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.१ मेलबर्न
कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२ मेलबर्न
अल्बर्ट क्रिकेट मैदान मेलबर्न
रिचमंड क्रिकेट मैदान मेलबर्न
मेलबर्न क्रिकेट मैदान मेलबर्न १ (अंतिम सामना)

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ ३.६३० अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४ ३.०९७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २० ३.४१८ ३ऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १.९६५
Flag of the Netherlands नेदरलँड्स १.६९५ स्पर्धेतून बाद

गट फेरी

[संपादन]

सामन्यांच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या -

२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२८४/१ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२९ (२५.१ षटके)

२९ नोव्हेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३२/४ (६० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७८/९ (६० षटके)

३० नोव्हेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८६ (५९.३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८७/७ (५८.२ षटके)

३० नोव्हेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९६/५ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११०/७ (६० षटके)

३ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१० (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८४/६ (६० षटके)

४ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
७८/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८१/० (२०.४ षटके)

४ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९७/५ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
८७ (५१ षटके)

५ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१२६ (५७.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/३ (४३.३ षटके)

६ डिसेंबर १९८८
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
९७ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९८/१ (२९.३ षटके)

७ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६७/९ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२१/८ (६० षटके)

९ डिसेंबर १९८८
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४३ (६० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४४/५ (५६.४ षटके)

१० डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२११/३ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३६/६ (६० षटके)

११ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६७/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२ (५७.४ षटके)

११ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१७/६ (६० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०६/८ (६० षटके)

१३ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१०९/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११०/० (२५.३ षटके)

१३ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२५५/२ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
७८ (५९.१ षटके)

१४ डिसेंबर १९८८
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५८/४ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
८५ (५३.३ षटके)

१४ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१७७ (५९.४ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७८/५ (५५ षटके)

१६ डिसेंबर १९८८
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
८८ (५६.२ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८९/० (२१.४ षटके)

१६ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७८/३ (६० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९८/९ (६० षटके)

बाद फेरी

[संपादन]

३ऱ्या स्थानाकरता सामना

[संपादन]
१७ डिसेंबर १९८८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०८/६ (६० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३८/७ (६० षटके)

अंतिम सामना

[संपादन]

१९८८ महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना मेलबर्न मधील मेलबर्न क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आला. अंतिम सामन्याला एकूण ३ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. ६० षटकांमध्ये इंग्लंडला केवळ १२७ धावा करण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने ह्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या केला. लिंडसे रीलरच्या नाबाद ५९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडला ८ गडी राखून हरवत सलग तिसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

१८ डिसेंबर १९८८
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२७/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२९/२ (४४.५ षटके)